आरती संग्रह

ह्या ब्लॉगवर सर्व आरत्या, श्लोक, संस्कृत सुभाषिते लिहायचा पण विचार आहे. काही दिवसापूर्वी आमच्या गणपती मंडळासाठी आरती चे पुस्तक छापायचे होते. त्यावेळेला आरत्या खूप शोधल्या. पण सापडतच नव्हत्या. ज्या होत्या त्या एक तर PDF मध्ये होत्या किंवा प्रिंट करण्याच्या योग्यतेच्या नव्हत्या. तेव्हाच विचार केला होता कि वेळ भेटेल तसा सर्व आरत्या ब्लॉग वर टाईप करून ठेवायच्या. हा ब्लॉग बनवण्याचा उद्देश्य हाच होता.

आपल्या सर्व आरत्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अशा शब्दात रचिल्या आहेत. कि त्यांना कुठलीही चाल लावा त्या तेव्हढ्याच मधुर आवाजात वाजतात. त्या तुम्ही एक टाळ घेवून वाजवा किंवा पूर्ण संगीताचे साधने घेऊन वाजवा किंवा फक्त टाळ्या वाजवता म्हणा त्या तेव्हढ्याच चांगल्या वाजतात.

आरती वरून सुरुवात झाली मग वाटले श्लोक पण संग्रही करून ठेवावे. मग ओघाओघाने पुराने, रामायण, महाभारत पण आले. शेवटी स्वत:चा ब्लॉग असताना सुद्धा खास ह्या गोष्टीला समर्पित केलेला एक ब्लॉग असावा असे वाटले आणि मग काय हा ब्लॉग रजिस्टर केला. ह्यात काही पोस्ट करण्यापूर्वी मी सर्व व्याकरण, शब्द रचना  कमीत कमी दोन वेळा तरी तपासणार आहे. पण तरी सुद्धा त्यात काही चुका राहिल्या तर नक्की कळवा. तशा सुधारणा नक्की करेन.

ब्लॉग रजिस्टर करून सुद्धा खूप दिवसानंतर ह्या पोस्ट टाकायला सुरुवात केल्या आहेत.
पुढचे काही ब्लॉग हे आरत्यांचे असतील. ह्या आरत्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत टाईप करणार आहे.

Post a Comment

0 Comments

Related Posts Plugin for WordPress, Blogger...