श्री विठ्ठलाची काकड आरती (विष्णुदास कृत)

 

श्री विठ्ठलाची काकड आरती (विष्णुदास कृत)


उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ १ ॥

संत साधु मुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमला ॥ २ ॥

रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी । मन उतावेळ रूप पहावया दृष्टी ॥ ३ ॥

राई रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । शेजे हालवुनी जागे करा देवराया ॥ ४ ॥

गरुड हनुमंत उभे पाहती वाट । स्वर्गींचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ५ ॥

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥ ६ ॥



राम कृष्ण हरी!!!

Post a Comment

0 Comments

Related Posts Plugin for WordPress, Blogger...