संकटनाशन गणेश स्तोत्र (मराठी अनुवाद)
साष्टांग नमन हे माझे, गौरीपुत्र विनायका ।
भक्तीने स्मरता नित्य, आयु:कामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष, चवथे गजवक्त्र ते ॥ २ ॥
पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकट नाव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्रीभालचंद्र, दहावे श्रीविनायक ।
अकरावे गणपती, बारावे श्रीगजानन ॥ ४ ॥
देवनावे अशी बारा, तीनसंध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला, प्रभो! तू सर्वसिद्धिद ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती ॥ ६ ॥
जपता गणपतीस्तोत्र, सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पूर्ण होता, मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले, झाले संपूर्ण स्तोत्र हे ।
श्रीधराने मराठीत, पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
![]() |
| संकटनाशन गणेश स्तोत्र मराठी शब्दांसह |
हे 'संकटनाशन गणेश स्तोत्र' असून मूळ संस्कृत स्तोत्राचा हा श्रीधरांनी केलेला अतिशय सुंदर मराठी अनुवाद आहे.
#GanpatiStotra, #GaneshChaturthi, #MarathiStotra, #Spiritual, #GreatIndianStories.
#SankatNashanStotra #MarathiAartiLyrics #GanpatiBappaMorya


0 टिप्पण्या